कोरोना लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभागासह प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:12 AM2020-12-28T04:12:19+5:302020-12-28T04:12:19+5:30

प्रांताधिकारी डाॅ. मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. यात तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश घोलप समन्वयक ...

Administration ready with health department for corona vaccination campaign | कोरोना लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभागासह प्रशासन सज्ज

कोरोना लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभागासह प्रशासन सज्ज

Next

प्रांताधिकारी डाॅ. मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. यात तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश घोलप समन्वयक असून, सदस्यांमध्ये तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. राजकुमार जऱ्हाड, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी आदींचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालये, दहा प्राथमिक आरोग्य केंद्रे, एक शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ६६ उपक्रेंद्रे, ५६२ अंगणवाडी केंद्रे आहेत. येथील शासकीय अधिकारी व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका व मदतनीस, असे एकूण १ हजार ७८८ जण, तर खासगी डॉक्टर व त्यांचे कर्मचारी, असे १ हजार ७२० जण अशा सर्व ३ हजार ५०८ जणांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.

Web Title: Administration ready with health department for corona vaccination campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.