जिल्ह्यात ११० कोरोना बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:34 AM2021-02-06T04:34:56+5:302021-02-06T04:34:56+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी ११० कोरोनाबाधितांची भर पडली, तर १२१ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. उपचार घेणाऱ्यांची संख्या ...

Addition of 110 corona victims in the district | जिल्ह्यात ११० कोरोना बाधितांची भर

जिल्ह्यात ११० कोरोना बाधितांची भर

Next

अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी ११० कोरोनाबाधितांची भर पडली, तर १२१ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी झाली असून, ती ९९३ इतकी झाली आहे, असे आरोग्य यंत्रणेने सांगितले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २६, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५३ आणि अँटीजन चाचणीत ३१ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये

नगर शहर (२३), नगर ग्रामीण (६), पारनेर (१३), पाथर्डी (५), राहता (१५), संगमनेर (१०), शेवगाव (२), श्रीगोंदा (७), अकोले (६), कोपरगाव (२), शेवगाव (२), जामखेड (३), कर्जत (२), राहुरी (५), श्रीरामपूर (६) येथील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ७२ हडार ६५६ इतकी झाली आहे. त्यापैकी बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ५५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.११ टक्के इतके झाले आहे. आतापर्यंत एकूण ११०६ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Addition of 110 corona victims in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.