श्रीरामपुरात अवैध दारू वाहतुकीवर कारवाई  दोघांना अटक : पाच लाखांहून अधिक मुद्देमाल ताब्यात

By शिवाजी पवार | Published: April 6, 2024 04:37 PM2024-04-06T16:37:06+5:302024-04-06T16:37:22+5:30

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी अवैध दारू विक्री व वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

Action taken against illegal liquor traffic in Srirampur: Two arrested: More than five lakh worth of goods seized | श्रीरामपुरात अवैध दारू वाहतुकीवर कारवाई  दोघांना अटक : पाच लाखांहून अधिक मुद्देमाल ताब्यात

श्रीरामपुरात अवैध दारू वाहतुकीवर कारवाई  दोघांना अटक : पाच लाखांहून अधिक मुद्देमाल ताब्यात

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शहरात अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ५ लाख ३२ हजार रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली.
येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय व शहर पोलिसांनी ही करवाई केली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी अवैध दारू विक्री व वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

श्रीरामपूर नेवासा मार्गावर बाजार समितीसमोर एक विना क्रमांकाची कार शुक्रवारी रात्री अकरा वाजता वेगाने जाताना पोलिसांना दिसली. पोलिस पथकाला संशय आल्याने त्यांनी कार  थांबविली. कार चालकाला विचारणा केली असता त्याने  उडवाउडवीची उत्तरे दिली.

पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कारची झडती घेतली असता त्यांना देशी व विदेशी कंपन्यांची दारू मिळून आली. एकूण ५ लाख ३३ हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी करण बाबासाहेब केंदळे (वय २७, रा.लक्ष्मीनगर नेवासा) व मोहसीन रशीद इनामदार (वय ३० रा. बाजारतळ नेवासा) यांना पोलिसांनी अटक केली.

Web Title: Action taken against illegal liquor traffic in Srirampur: Two arrested: More than five lakh worth of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.