The accused who stole the motorcycle was caught | मोटारसायकल चोरणाऱ्या आरोपीला पकडले

मोटारसायकल चोरणाऱ्या आरोपीला पकडले

.........

मोबाईल चोरला

अहमदनगर : विळद घाट येथील विखे-पाटील होस्टेल येथून चोरट्याने एक मोबाईल चोरून नेला. ८ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पंकज महादेव किर्दत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक साबीर शेख हे पुढील तपास करत आहेत.

.............

भाजीपाल्याचे भाव वाढले

अहमदनगर : विकेंड लॉकडॉऊनमुळे बहुतांशी नागरिकांनी दोन दिवस आधीच भाजीपाला खरेदी करून ठेवल्याने बाजारात भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. मिरची ६० ते ८० रुपये किलो, बटाटे २० ते २५ रुपये किलो, वांगे ४० ते ६० रुपये किलो, कोबी ४० ते ५० रुपये असे स्वरूपाने भाजीपाल्याचे भाव वाढले.

.........

सचिन कोतकर यांना पीएच. डी.

अहमदनगर : येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील प्रा. सचिन माधवराव कोतकर यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी विषयात पीएच.डी.पदवी प्रदान केली आहे. प्रा. कोतकर यांनी प्रा. डॉ संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांकेतिक व गुप्त भाषेतील शब्दावलीचा समाजभाषावैज्ञानिक अभ्यास या विषयावर प्रबंध सादर केला होता. कोतकर यांचे अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जे. बार्नबस, प्रा. डॉ. सुधाकर शेलार, प्रा. डॉ. संजय घोडेकर, डॉ. प्रकाश सूर्यवंशी आदींनी कौतुक केले आहे.

Web Title: The accused who stole the motorcycle was caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.