The accused escaped from the district hospital in the city | नगरच्या जिल्हा रुग्णालयातून आरोपीचे पलायन 
नगरच्या जिल्हा रुग्णालयातून आरोपीचे पलायन 

अहमदनगर : गांजा तस्करी करताना कोतवाली पोलिसांनी पकडलेल्या आरोपीने रविवारी (दि़१३) रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयातून पलायन केले. सागर रामचंद्र धनापुरे (रा़ तपोवनरोड, नगर) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. 
कोतवाली पोलिांनी तीन दिवसांपूर्वी केडगाव बायपास येथून गांजा तस्करी करताना दोघांना अटक केली होती. यावेळी ७५ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला होता. यातील सागर धनापुरे याला पोटाचा त्रास सुरू झाल्याने रविवारी रात्री त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी धनापुरे याला एक पोलीस कर्मचारी प्रात:विधीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसाच्या हाताला झटका मारून पलायन केले. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो पळून गेला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Web Title: The accused escaped from the district hospital in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.