महावितरणच्या कर्मचा-यास शिवीगाळ व धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 06:38 PM2017-09-14T18:38:51+5:302017-09-14T18:39:57+5:30

वीज मीटरची तपासणी करणा-या महावितरणच्या कर्मचा-यास शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 Abuse and shock absorption of employees of MSEDCL | महावितरणच्या कर्मचा-यास शिवीगाळ व धक्काबुक्की

महावितरणच्या कर्मचा-यास शिवीगाळ व धक्काबुक्की

Next
ठळक मुद्देसरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल

कोपरगाव : वीज मीटरची तपासणी करणा-या महावितरणच्या कर्मचा-यास शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महावितरणचे कर्मचारी राजेंद्र रघुनाथ कोळी हे बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास शहरतील हॉटेल साई सृष्टीजवळ वीज  मीटर तपासण्यासाठी गेले होते. याचा राग आल्याने आरोपी सोमनाथ तुळशीराम आढाव यांनी त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. याप्रकरणी कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आढाव यांच्याविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पी.वाय.कादरी पुढील तपास करीत आहेत.
 

Web Title:  Abuse and shock absorption of employees of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.