Abb .... In a single day in Nagar district, 20 corona-affected, transition in urban areas increased | अबब....नगर जिल्ह्यात एकाच दिवसात २० कोरोनाबाधित, नगर शहरात संक्रमण वाढले

अबब....नगर जिल्ह्यात एकाच दिवसात २० कोरोनाबाधित, नगर शहरात संक्रमण वाढले

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचे मंगळवारी एकाच दिवसात २० नवे रुग्ण आढळून आले. त्यामध्ये अकोले तालुक्यात सहा तर अहमदनगर शहरात सात नवे रुग्ण आढळून आले आहेत. इतर रुग्ण संगमनेर, अकोले, श्रीगोंदा आणि राहाता तालुक्यातील आहेत. नगर शहरातील हे रुग्ण माळीवाडा, भवानीनगर, केडगाव, रेल्वे स्टेशनरोड, परिसरातील आहेत. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिका प्रशासनही सतर्क झाले आहे. एकूण २० रुग्णांपैकी १२ या महिला आहेत. त्यामुळे जिल्<रठॠ-दळर>ातील एकूण रुग्णसंख्या १७२ एवढी झाली आहे.
एकट्या अकोले तालुक्यात ७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये जवळे येथील ४८ आणि २४ वर्षीय महिला आणि २८ वर्षीय पुरुष बाधित झाला आहे. वाघापूर येथील ३२ आणि ४० वर्षीय महिला आणि ४५ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला आहे. सर्व बाधित हे यापूर्वीच्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. तसेच बोरी येथील साठ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे.
संगमनेर तालुक्यात चार जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. डिग्रज, मालुंजा येथील २१ आणि ४५ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे या दोन्ही महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. संगमनेर शहरातील जुने पोस्ट आॅफिस येथील ३६ वर्षांची महिला आणि अडीच वर्षे वयाचा मुलगा कोरोनाबाधित आढळून आला आहे. श्रीगोंदा तालुक्यात कांडेगाव येथील ७५ वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे. लोणी (ता. राहाता) येथील ५६ वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आली आहे.
---
नगर शहरात सात जण बाधित
नगर शहरात एकाच दिवशी सात जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. रेल्वे स्टेशन रोडवरील ३३ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे. सायंकाळच्या अहवालात सहा जण बाधित आढळून आले. त्यामध्ये सोमवारी मार्केटयार्ड-भवानीनगर येथील तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या कुटुंबातील पत्नी, मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच मार्केटयार्ड भागातील २८ वर्षीय युवकही बाधित झाला आहे. माळीवाडा येथील ४२ वर्षीय पुरुष आणि केडगाव येथील २९ वर्षीय युवकालाही कोरोनाची लागण झाली आहे.
---

Web Title:  Abb .... In a single day in Nagar district, 20 corona-affected, transition in urban areas increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.