कोपरगाव तालुक्यातील धामोरीत बिबट्याचा शेतकर्‍यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2023 12:02 PM2023-03-01T12:02:02+5:302023-03-01T12:05:50+5:30

ठाकरे यांनी कुत्र्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु बिबट्याने कुत्र्याला सोडून ठाकरे यांच्यावर चाल करत हल्ला चढविला.

A leopard attacked a farmer in Dhamori in Kopargaon taluka | कोपरगाव तालुक्यातील धामोरीत बिबट्याचा शेतकर्‍यावर हल्ला

कोपरगाव तालुक्यातील धामोरीत बिबट्याचा शेतकर्‍यावर हल्ला

googlenewsNext

काका खर्डे 

धामोरी - कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील शेतकरी गंगाधर ठाकरे यांच्यावर बुधवारी (दि.१) रात्री २:४० वाजताच्या सुमारास बिबट्यांने हल्ला केला आहे. त्यात ठाकरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सद्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धामोरी शिवारातील वस्तीवर गंगाधर ठाकरे हे कुटुंबासह राहतात. रात्री २:४० च्या दरम्यान बिबट्याने ठाकरे यांच्या वस्तीवरील कुत्र्यावर प्रथम हल्ला केला. ठाकरे यांनी कुत्र्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु बिबट्याने कुत्र्याला सोडून ठाकरे यांच्यावर चाल करत हल्ला चढविला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असूनपुढिल उपचार सुरु आहे. त्यांच्या जखमांना जवळपास ५२ टाके पडले आहेत.

Web Title: A leopard attacked a farmer in Dhamori in Kopargaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.