बारी चेकपोस्टवर अवैध दारूसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:00 PM2020-06-27T17:00:48+5:302020-06-27T17:01:50+5:30

अकोले तालुक्यातील कोल्हार घोटी रस्त्यावरील बारी येथील चेक पोस्टवर राजूर पोलिसांनी गुरुवारी अवैध दारूसह ८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

8 lakh worth of illicit liquor seized at Bari check post | बारी चेकपोस्टवर अवैध दारूसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

बारी चेकपोस्टवर अवैध दारूसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext

राजूर : अकोले तालुक्यातील कोल्हार-घोटी रस्त्यावरील बारी येथील चेक पोस्टवर राजूर पोलिसांनी गुरुवारी अवैध दारूसह ८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जिल्ह्याच्या सीमेवरील बारी येथे उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर नाशिक जिल्ह्यातून आलेल्या एक कार ( एम. एच. १७, बी. एस. ५००४) वाहनाची तपासणी करण्यात आली.  कारमध्ये विदेशी दारूचे १५ बॉक्स आढळून आले. एकूण ७२० बाटल्या मिळून आल्या. 

याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक गाडे यांनी फिर्याद दाखल केली. राजूर पोलिसांनी दारुसह वाहतूक करणारी गाडी जप्त करीत राहुल गोपाळ मोहोड ( वय ४०, शेंडी ता. अकोले) यास अटक केली.

Web Title: 8 lakh worth of illicit liquor seized at Bari check post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.