8 goats killed in leopard attack; Unfortunate incident in Shrigonda taluka | बिबट्याच्या हल्ल्यात ८ शेळ्या ठार; श्रीगोंदा तालुक्यातील दुर्दैवी घटना

बिबट्याच्या हल्ल्यात ८ शेळ्या ठार; श्रीगोंदा तालुक्यातील दुर्दैवी घटना

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) :  श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव शिवारात देवमळा परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर बिबट्यांनी बुधवारी रात्री हल्ला केला.  बिबट्यांच्या या हल्ल्यात आठ शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. गेल्या आठ दिवसांपासून मढेवडगाव शिवारात बिबट्यांनी  बस्तान बसविले असुन सुरुवातीला कुत्री गायब केली. आता शेतकऱ्यांच्या शेळ्यांकडे मोर्चा वळविला आहे.

बुधवारी रात्री महादेव कांबळे,  नाना कोळपे, सोनबा भांडे, रंगनाथ मांडे, राजू शिंगटे यांच्या आठ शेळ्या अंगणातून नेत ठार केल्याने, अशी माहिती राहुल साळवे यांनी दिली. बिबट्याने मढेवडगाव शिवारात ऊसाच्या शेतात निवारा शोधला असून दिवसा आराम आणि रात्री पोटासाठी शिकार शोधणे असा दिनक्रम सुरु केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली लहान मुल आणि शेळ्या वासरे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

बिबट्याला बरोबर घेऊन जगावे 

बिबट्या हा शेतकऱ्यांचा मित्र आहे  भविष्यात त्याला बरोबर घेऊन राहावे लागणार जगावे लागणार आहे.  शेतातील पिकांची रानडुकरे  नासाडी करतात रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी बिबट्या पुरेसा आहे. बिबट्या घातक असला तरी शेतकऱ्यांचा मित्र  आहे. फक्त  लहान मुलांवर लक्ष ठेवा व शेळ्या मेंढ्या वासरे यांना रात्रीच्या वेळी बंदिस्त गोठ्यात बांधावीत आणि रात्रीच्या वेळी एक काठी व बाॅटरी बरोबर घेऊन शेतात जावे. -कल्याण साबळे, सहाय्यक वनसंरक्षक, पुणे 

Web Title: 8 goats killed in leopard attack; Unfortunate incident in Shrigonda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.