कृषी उद्योग महामंडळात ६६ लाखांचा अपहार; अहमदनगर उपविभागीय कार्यालयातील दोन अधिका-यांसह लिपिकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 06:12 PM2017-11-24T18:12:39+5:302017-11-24T18:23:10+5:30

महाराष्ट्र शासनाच्या कृषी उद्योग विकास महामंडळाच्या अहमदनगर येथील उपविभागीय कार्यालयातील दोन अधिका-यांसह एका वरिष्ठ लिपिकाने ६६ लाख ३ हजार रूपयांची अफरातफर केल्याने त्यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

66 lakhs in agriculture industry corporation; A crime against the scribe along with two officials of the sub-divisional office of Ahmednagar | कृषी उद्योग महामंडळात ६६ लाखांचा अपहार; अहमदनगर उपविभागीय कार्यालयातील दोन अधिका-यांसह लिपिकावर गुन्हा

कृषी उद्योग महामंडळात ६६ लाखांचा अपहार; अहमदनगर उपविभागीय कार्यालयातील दोन अधिका-यांसह लिपिकावर गुन्हा

Next
ठळक मुद्देनगर येथील विभागीय कार्यालयाचा प्रमुख राजेंद्र बयाजी होले, उपव्यवस्थापक महेश मनोहर राजूरकर व लिपिक रामदास भाऊसाहेब कुलट यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.होले, राजूरकर व कुलट यांनी संगनमताने सन २०१२ पासून पैशांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतक-यांना शेती अवजारांचे वाटप होते.

अहमदनगर : महाराष्ट्र शासनाच्या कृषी उद्योग विकास महामंडळाच्या येथील उपविभागीय कार्यालयातील दोन अधिका-यांसह एका वरिष्ठ लिपिकाने ६६ लाख ३ हजार रूपयांची अफरातफर केल्याने त्यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी उद्योग महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक भागवत भाऊसाहेब लांबे यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी कृषी उद्योग महामंडळाच्या नगर येथील विभागीय कार्यालयाचा प्रमुख राजेंद्र बयाजी होले, उपव्यवस्थापक महेश मनोहर राजूरकर व लिपिक रामदास भाऊसाहेब कुलट यांच्याविरोधात कलम ४२०, ४०८, ४६८ ४७१ व ४७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील मार्केटयार्ड येथील उपविभागीय कार्यालयात होले, राजूरकर व कुलट यांनी संगनमताने सन २०१२ पासून पैशांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतक-यांना शेती अवजारांचे वाटप होते. या अवजारांसाठी अनुदानाव्यतिरिक्त असणारा लोकवाटा हा शेतकरी पंचायत समितीकडे भरतात. पंचायत समितीकडून हे पैसे कृषी उद्योग महामंडळाच्या उपविभागीय कार्यालयाकडे पाठवितात. पंचायत समितीने हे पैसे पाठविल्यानंतर कार्यालयातील अधिका-यांनी हे पैसे संबंधित तालुक्याच्या नावे न दाखविता ते पैसे डिलरच्या नावे दाखविले. त्यामुळे पंचायत समितीकडून पैसे येऊनही संबंधित तालुके निरंक दिसले. या गैरव्यवहाराची लांबे यांनी चौकशी करून तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे हे करत आहेत.

Web Title: 66 lakhs in agriculture industry corporation; A crime against the scribe along with two officials of the sub-divisional office of Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.