शहरं
Join us  
Trending Stories
1
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
2
अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!
3
तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना
4
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी वाराणसीबाबत अजय राय यांनी दिला असा मेसेज, वाढू शकतं मोदींचं टेन्शन
5
Fact Check : राष्ट्रगीत सुरू होतं आणि पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसले?; जाणून घ्या 'सत्य'
6
गुरुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वृद्धी योग; वरदान काळ, तुमची रास कोणती?
7
Sushant Singh Death Anniversary : सुशांतच्या बहिणीने शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ; म्हणाली - 'हा राजकीय अजेंडा...'
8
BEST Bus Breakdowns: नुसता वैताग! बेस्ट बस भर रस्त्यात बंद पडण्याचं प्रमाण वाढलं, ६ महिन्यांत २११ वेळा घटना
9
सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने राज ठाकरेंनी सिद्धार्थला सुनावले होते खडेबोल, अभिनेत्याने सांगितला किस्सा
10
'मधुबाला' फेम अभिनेत्रीने लग्नानंतर ९ वर्षांनी दिली गुडन्यूज, वयाच्या 38 व्या वर्षी देणार बाळाला जन्म
11
Kangana Ranaut : कंगनाला मिळणार इतका पगार; मोफत घरासह आलिशान सुविधा, खासदार झाल्यावर बदलणार आयुष्य
12
National News धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ
13
Durgashtami: आज शुक्रवार आणि दुर्गाष्टमी, या संयोगावर घरच्याघरी करा लक्ष्मी कुंकुमार्चन; होतील अनेक लाभ!
14
"फोटोत दिसताय त्याप्रमाणे नेहमी हसत...", राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ताची खास पोस्ट
15
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची तरुणाईमध्ये क्रेझ; तुम्हाला माहितीये का बिहारच्या या लेकाचं शिक्षण?
16
खासदार होताच युसूफ अडचणीत; गुजरातमधील सरकारी भूखंडावर कब्जा केल्याप्रकरणी नोटीस
17
हमासनंतर आता हिजबुल्लाहनं उडवली इस्रायलची झोप, 250 रॉकेट डागले; मोठं युद्ध भडकण्याची शक्यता 
18
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचं आमंत्रण मिळाल्यावर पूनम ढिल्लो म्हणाल्या, "जहीर, प्लीज तिला..."
19
'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा
20
PHOTOS : अमेरिकेत 'सूर्या'चा रोमँटिक अंदाज! भारतीय शिलेदाराची पत्नीसोबत भटकंती

विसापूर कारागृहाचे ५३ कैदी रजा मिळूनही कारागृहातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 11:28 AM

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातील ५३ कैदी सुट्टीवर घरी गेले आहेत. मात्र काही कैद्यांना सुट्टी (रजा) मिळत असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने त्यांनी कारागृहातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

नानासाहेब जठार ।  विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातील ५३ कैदी सुट्टीवर घरी गेले आहेत. मात्र काही कैद्यांना सुट्टी (रजा) मिळत असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने त्यांनी कारागृहातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.विसापूर कारागृहाची क्षमता २०० कैद्यांची असून कारागृहात सध्या ९७ कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ८ मे रोजी वेगवेगळ्या कारागृहात शिक्षा भोगणाºया कैद्यांना ४५ दिवसाच्या अभिवचन रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विसापूर कारागृहातील ५३ कैद्यांना रजेवर पाठवण्यात आले आहे. या सर्व रजेवर जाणाºया कैद्यांना त्यांच्या मूळगावी व शहरात घरी जाण्यासाठी अडचणी येऊ नयेत, यासाठी कारागृह प्रशासनाकडून ओळखपत्रे देण्यात आली.कैदी कारागृहातून रवाना करताना त्यांची आरोग्य तपासणी कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत वाघ यांनी केली. कारागृह प्रशासनाच्या माहितीनुसार सर्व कैदी आपआपल्या घरी सुखरूप पोहचले आहेत. आणखी सात कैदी अभिवचन रजेवर पाठवण्यास पात्र आहेत. मात्र त्यापैकी काही कैदी कोरोनाचा धोका नको म्हणून सुट्टीवर जाण्यासाठी इच्छुक नाहीत. त्यांच्या गावी गेलेले कैदी त्या त्या भागात क्वारंटाईन झाले आहेत, अशी माहिती विसापूर कारागृहाचे तुरूंगाधिकारी बाळकृष्ण जासूद यांनी दिली.

विसापूर कारागृहातील ५३ कैद्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्णयानुसार ४५ दिवसांच्या रजेवर पाठवण्यात आले. ४५ दिवसानंतर स्वत: कारागृहात हजर होण्याचे त्यांच्याकडून अभिवचन घेण्यात आले आहे. रजा संपल्यानंतर ते कारागृहात हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे विसापूर खुले जिल्हा कारागृहाचे अधीक्षक प्रकाशसिंग परदेशी यांनी सांगितले. 

माझी शिक्षा आणखी अडीच वर्षे बाकी आहे. मला कारागृहाकडून ४५ दिवसांची रजा मिळत आहे. मात्र माझी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला जाण्याची व धोका पत्करण्याची इच्छा नाही. कोलकात्याला जाण्याची व्यवस्था झाली तर जाईन. अन्यथा मी कारागृहातच सुरक्षित आहे, असे कारागृहातील परप्रांतीय कैदी मनीष ठाकूर याने सांगितले.  

मी ठाणे येथील रहिवासी आहे. माझी शिक्षा आणखी दोन वर्षे बाकी आहे. तरीही मी ४५ दिवसांच्या अभिवचन रजेवर जाणार नाही. कोरोनाचा धोका माझ्यासाठी व कुटुंबातील लोकांसाठी निर्माण करू इच्छित नाही. त्यामुळे कारागृहातच राहणार आहे, असे विसापूर कारागृहातील कैदी प्रशांत पवार याने सांगितले.     

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाjailतुरुंगcorona virusकोरोना वायरस बातम्या