3 killed in accidental accident in ahemadnagar-pune road | पहाटेच्या झोपेत चालकाचा ताबा सुटला, भीषण अपघातात 3 ठार 1 जखमी
पहाटेच्या झोपेत चालकाचा ताबा सुटला, भीषण अपघातात 3 ठार 1 जखमी

अहमदनगर - नगर पुणे महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जखमी.आहे. जखमीला जवळील रुग्णायात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमधील सर्वच व्यक्ती हे धुळ्याचे रहिवाशी होते. 

पुणेकडून नगरकडे जाणाऱ्या रोडवर  जातेगाव फाट्याजवळ उभ्या असणाऱ्या ट्रक MH 22 AA 524 वर  पाठिमागून आलेल्या स्कार्पिओ नंबर MH 18 AJ 8443 या गाडीने जोराची धडक दिली. पहाटेच्या झोपेत चालकाचे गाडीवरल नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात तीन जण ठार झाले व एक जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले सह ताफा दाखल. जखमींना तात्काळ उपचारासाठी पाठवले आहे. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतल्यानंतर रस्ता सुरळीत चालू असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नाही

मृतांची नावे पुढीलप्रमाणे
 1) ओझायर तसनीय  अख्तर अन्सारी वय-30 रा.फिरदोस नगर,धुळे
2)फैसल गुलाब रब्बाली अन्सारी वय-20 रा.मछली बाजार ,धुळे
3)इरफान शयशोदोहा अन्सारी वय-20 रा.मछली बाजार ,धुळे
 जखमी-
1)अदनान निहाल अन्सारी वय-21रा.तिरंगा चौक ,धुळे
 


Web Title: 3 killed in accidental accident in ahemadnagar-pune road
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.