शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

मुळा धरणाचे ११ दरवाजे उघडले; नदीपात्रातील बंधारे भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 4:06 PM

मुळा धरण पुन्हा १०० टक्के भरल्यानंतर मुळा धरणाचे ११ दरवाजे मंगळवारी उघडण्यात आले आहे़ नदीपात्रात १ हजार १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ नदीतील डिग्रस येथील कोल्हापूर पध्दतीचा बंधार पूर्ण क्षमतेने भरला असून मानोरी बंधाºयात पाणी सोडले आहे.

राहुरी : मुळा धरण पुन्हा १०० टक्के भरल्यानंतर मुळा धरणाचे ११ दरवाजे मंगळवारी उघडण्यात आले आहे़ नदीपात्रात १ हजार १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ नदीतील डिग्रस येथील कोल्हापूर पध्दतीचा बंधार पूर्ण क्षमतेने भरला असून मानोरी बंधाºयात पाणी सोडले आहे.गेल्या पाच दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे़  त्यामुळे कोतूळ येथे पुन्हा ५०० क्युसेकने पाण्याची आवक धरणाकडे सुरू आहे़ याशिवाय पारनेर तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने मधल्या भागातील पाणी धरणाकडे येत आहे़ सोमवारी धरणातून सुरू असलेला पाण्याच विसर्ग ५०० क्युसेकवरून ११०० क्युसेक करण्यात आला आहे़ आजही पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पावसाची हजेरी सुरू होती़ २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण असलेल्या मुळा धरणाच्या प्रत्येक मोरीव्दारे १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू झाल्यामुळे नदीकाठावरील शेतीला लाभदायक ठरणार आहे़ मुळा नदीवरील डिग्रस, मांजरी, मानोरी, वांजुळपोई हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरणार आहेत़ त्यामुळे नदी काठी असलेल्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे़ मुळा नदीपात्रात असलेल्या बंधा-याच्या फळ्यातून पाण्याची गळती होणार तर नाही ना? याची शंका शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे़मुळा धरणातून मंगळवारी नदीपात्रात विसर्ग ११०० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे़ धरण पूर्ण क्षमतेने पुन्हा भरले आहे़ पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक सुरू आहे़ २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी कायम ठेवून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे़ डाव्या अथव्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाण्याची मागणी करण्यात आलेली नाही़, असे मुळा धरण अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले. 

टॅग्स :DamधरणAhmednagarअहमदनगर