2 bore rifles disappear from the Vastu Museum at Lord Gad | भगवान गडावरील वास्तू संग्रहालयातील 2 बोअर रायफल गायब 

भगवान गडावरील वास्तू संग्रहालयातील 2 बोअर रायफल गायब 

पाथर्डी (जि. अहमदनगर) : तालुक्यातील भगवानगडावर असलेल्या भगवान बाबांच्या वापरातील वस्तूंच्या संग्रहातील २ बोअरची रायफल सापडत नसल्याचे आज सकाळी उघडकीस आले. या संदर्भात पाथर्डी पोलीस ठाण्याला प्राथमिक माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राठोड हे भगवान गडावर गेले आहेत. गडावरील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केल्यानंतर काही माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. त्यानुसार, मध्यरात्रीच्या सुमारास एका दुचाकीवर आलेल्या तिघांनी रायफल घेऊन गेल्याचे दिसत आहे. त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी दिली.

Web Title: 2 bore rifles disappear from the Vastu Museum at Lord Gad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.