अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २५ अधिका-यांच्या बदल्या झाल्या असून, त्यात १० उपजिल्हाधिकारी व १५ तहसीलदारांचा समावेश आहे. या सर्व अधिका-यांना नाशिक विभागांतर्गत नियुक्त्या मिळाल्या आहेत, तर नाशिक विभागातीलच अधिकारी नगरसाठी बदलून आले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील सर्व अधिका-यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २० फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश निघाले. यामध्ये नगर जिल्ह्यातील १० उपजिल्हाधिका-यांचा समावेश आहे. यापूर्वी उपजिल्हाधिकारी अरूण आनंदकर व जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित यांची बदली झालेली आहे. दरम्यान, बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांचीही बदली झाली.उपजिल्हाधिका-यांसह जिल्ह्यातील १५ तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेशही बुधवारीच निघाले. गेल्या आठवड्यापासून हे अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत होते. बदलीचे आदेश मिळताच त्यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत.विशेष म्हणजे यातील बहुतांश अधिका-यांना नाशिक विभागांतर्गत नियुक्त्या मिळाल्या आहेत. तर तेथीलच अधिकारी येथे बदलून आहे आहेत. ब-याच जागांवर अधिका-यांची त्याच पदावर केवळ अदलाबदली झालेली आहे.बदली झालेले अधिकारीउपजिल्हाधिकारी, सध्याची नियुक्ती, नवीन नियुक्ती१) राजेंद्र वाघ भूसंपादन क्रं. १, विशेष भूसंपादन अधिकारी, जळगाव२) संदीप आहेर महसूल प्रांत, दिंडोरी, नाशिक३) भागवत डोईफोडे प्रांत संगमनेर भूसंपादन अधिकारी, धुळे४) ज्योती कावरे जिल्हा पुनर्वसन अधिकारी वैतरणा जलविद्युत प्रकल्प, नाशिक५) गोविंद दाणेज प्रांत श्रीगोंदा-पारनेर उपजिल्हाधिकारी रोहयो, धुळे६) निलेश जाधव भूसंपादन क्र. १५ सहायक आयुक्त (मावक), नाशिक७) जयश्री माळी भूसंपादन क्र. ०३ जिल्हा पुरवठा अधिकारी, नगर८) वामन कदम उपजिल्हाधिकारी रोहयो निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव९) रविंद्र ठाकरे प्रांत, शिर्डी जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव१०) धनंजय निकम साईबाबा संस्थान उपजिल्हाधिकारी, महसूल, नंदूरबार---------------------------------------------------------------- बदलून आलेले उपजिल्हाधिकारी (कंसात आधीची नियुक्ती)१) उदय किसवे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. ७ (प्रांत, दिंडोरी, नाशिक)२) पंकज चौबळ, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. १३ (उपजिल्हाधिकारी भूसंपादन, धुळे)३) शशिकांत मंगरूळे, प्रांताधिकारी संगमनेर (उपजिल्हाधिकारी, प्रशासन, नाशिक)४) महेश पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी (प्रांताधिकारी, निफाड)५) संजय बागडे, प्रांताधिकारी, श्रीगोंदा-पारनेर (सहायक आयुक्त (मावक) नाशिक)६) राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. ३, (निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव)७) जितेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी, रोहयो८) गोविंद शिंदे, प्रांताधिकारी, शिर्डी (जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव)बदली झालेले तहसीलदार नवीन नियुक्तीअनिल दौंडे, राहुरी नाशिकराहुल कोताडे, सामान्य प्रशासन, नगर सिन्नर, जि. नाशिकजितेंद्र इंगळे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी तहसीलदार बागलाण, जि. नाशिकमनिषा राशीनकर, धान्य वितरण अधिकारी धान्य वितरण अधिकारी, नाशिकअप्पासाहेब शिंदे, नगर सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिकहेमा बडे, महसूल, जि. कार्यालय धान्य वितरण अधिकारी, मालेगाव, जि. नाशिकसदाशिव शेलार, संजय गांधी योजना संजय गांधी योजना, मनपा क्षेत्र, नाशिकराजेंद्र थोटे, पुनर्वसन अक्राणी, जि. नंदूरबारसुधीर पाटील, नेवासा महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, अ. नगरउमेश पाटील, निवडणूक शाखा नगर तालुकागणेश मरकड, पारनेर भडगाव, जि. जळगावकिरण सावंत पाटील, कर्जत अन्नधान्य वितरण अधिकारी, नगरकिशोर कदम, कोपरगाव चाळीसगाव, जि. जळगावसुभाष दळवी, श्रीरामपूर संजय गांधी योजना, जळगावमोहमंद फसियोदिन शेख, भूसुधार राहुरीबदलून येणारे तहसीलदारमहेश शेलार, पुनर्वसन, नगरज्योती देवरे, भूसुधार, नगरप्रवीण चव्हाणके, पारनेरयोगेश चंद्रे, कोपरगावसी. एम. वाघ, कर्जतअमोल निकम, संगमनेरप्रशांत पाटील, श्रीरामपूरसुनील सैंदाणे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारीमनोज देशमुख, संजय गांधी योजनारूपेश सुराणा, नेवासानरेशकुमार टी बहिरम, निवडणूक शाखा