नगर व पुणे जिल्ह्याचा फायनल सम्राट हरपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 14:00 IST2019-02-18T13:36:05+5:302019-02-18T14:00:04+5:30
झुंबरशेठ आंधळे यांची राज्यात बैलगाडा शर्यतीमध्ये फायनल सम्राट म्हणून ओळख होती. प्रसिद्ध वाहतूक व्यावसायिक, कर्जुले हरेश्वरचे प्रगतशील शेतकरी म्हणूनही ते प्रसिद्ध होते.

नगर व पुणे जिल्ह्याचा फायनल सम्राट हरपला
पारनेर - महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक, कर्जुले हरेश्वर (पारनेर) गावचे प्रगतशील शेतकरी झुंबरशेठ विठ्ठल आंधळे यांचे सोमवारी (१८ फेब्रुवारी) सकाळी दु;खद निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन बहिणी, दोन मुले, दोन मुली, पुतणे, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष व दैनिक ‘नगर सह्याद्री’ चे संपादक शिवाजी शिर्के यांचे ते सासरे होते.
झुंबरशेठ आंधळे यांची राज्यात बैलगाडा शर्यतीमध्ये फायनल सम्राट म्हणून ओळख होती. प्रसिद्ध वाहतूक व्यावसायिक, कर्जुले हरेश्वरचे प्रगतशील शेतकरी म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांना नगर जिल्हा परिषदेचा आदर्श प्रगतीशील शेतकरी पुरस्कार व आदर्श गोपालक पुरस्कार मिळालेला असून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवून ते यशस्वी झाले होते.
सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, व्यावसायिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील सर्व संस्था तसेच व्यावसायीकांनी बंद पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सर्व क्षेत्रातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.