शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
3
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
4
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
7
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
8
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
9
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
10
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
11
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
12
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
13
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
14
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
16
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
17
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
18
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
19
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
20
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय

जिल्हा परिषद : डाटा एन्ट्री निविदेत गफला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 12:27 IST

अहमदनगर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या डाटा एन्ट्रीचे काम देताना शासन नियमांची पायमल्ली करण्यात आली असून, नियम धाब्यावर बसवून ...

अहमदनगर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या डाटा एन्ट्रीचे काम देताना शासन नियमांची पायमल्ली करण्यात आली असून, नियम धाब्यावर बसवून मर्जीतील संस्थेला काम देण्यात आले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी साई एजन्सीचे संचालक किरण जगताप यांनी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.राष्ट्रीय आरोग्य विभागातील माहितीच्या संगणकीकरणासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांत स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविली गेली. अहमदनगर जिल्हा परिषदेने २० एप्रिलपासून निविदा विक्री सुरू केली. ती ४ मे पर्यंत सुरू होती. तोपर्यंत मर्यादित, खासगी मर्यादित आणि नोंदणीकृत संस्थाच फक्त निविदा भरू शकत होत्या. मात्र दोन महिन्यांत अटी व शर्तीत बदल केला गेला. दि़ २६ जून रोजी अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार यांनी प्रोपरायटर्सशिप संस्थांनाही निविदा भरण्याची परवानगी दिली. मात्र ही परवानगी देताना ज्या जिल्हा परिषदांची निविदा विक्री बंद झाली, अशा जिल्हा परिषदांनी प्रोपरायटर्सशिप संस्थांना पात्र ठरू नये, असेही पत्रात नमूद आहे.अहमदनगरची निविदा विक्री मे महिन्यातच संपली होती.त्यामुळे नवीन आदेश या परिषदेला लागू नव्हता. पण, जिल्हा परिषदेने जुन्या निविदा प्रक्रियेदरम्यान दाखल झालेल्या महाराष्ट्र विकास ग्रुप, या प्रोपरायटर्सशिप असलेल्या संस्थेला डाटा एन्ट्रीचे एक कोटीचे काम दिले. या संस्थेने नव्याने पत्र येण्यापूर्वीच निविदा भरली होती. त्यामुळे प्रोपरायटर्सशिप असलेली संस्था पात्र कशी ठरली, असा प्रश्न उपस्थित होतो. या कामासाठी प्रोपरायटर्सशिप व सहकारी संस्थेच्या प्रत्येकी दोन निविदा आल्या होत्या. महाराष्ट्र विकास ग्रुप, छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था आणि रयत स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, या तिन्ही संस्था नाशिकच्या आहेत. तसेच जालना येथील साई एजन्सीनेही निविदा भरली. पण, त्यांना अपात्र ठरविण्यात आले़ यावर कळस असा की, महाराष्ट्र विकास गु्रप व छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्था, या दोन्ही संस्थांचा आॅगस्ट २०१७ चा पीएफ चलन फॉर्म सारखाच असल्याचे तक्रारीत नमूद आहे.निविदा प्रसिध्द करण्यापूर्वी ठेकेदारांची बैठक घेऊन नियमानुसार प्रक्रिया राबविण्यात आली असून, सर्वांना कागदपत्र सादर करण्याची संधी दिली होती.-अमोल शिंदे,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक

तक्रार प्राप्त झाली असून, त्याची चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.- विश्वजित माने,मुख्यकार्यकारी अधिकारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद