वडाळा बहिरोबा येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 14:18 IST2020-07-08T14:18:28+5:302020-07-08T14:18:38+5:30
नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील अक्षय संजय बोरुडे (वय १८) याने राहात्या घरी मंगळवारी (७ जुलै) रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घरातील अँगलला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

वडाळा बहिरोबा येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
नेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील अक्षय संजय बोरुडे (वय १८) याने राहात्या घरी मंगळवारी (७ जुलै) रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घरातील अँगलला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनीशिंगणापूर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
पुढील तपास पो.हे.काँ. माळवे हे करीत आहेत. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.