युवकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 13:36 IST2021-03-12T13:36:00+5:302021-03-12T13:36:30+5:30
नेवासा तालुक्यातील पुनतगाव शिवारात एका युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

युवकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पुनतगाव शिवारात एका युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पाचेगाव- पुनतगाव रस्त्याच्या कडेला असणाऱ्या उसाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी(दि.१२) सकाळी उघडकीस आली.
सुनील वामन पंडुरे ( वय २६) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. गेल्या बुधवारपासून हा युवक बेपत्ता होता. परिसरात, नातेवाईकांकडे शोधाशोध घेऊनही हा युवक सापडत नव्हता. नेवासा पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार देखील नोंदविण्यात आली होती. आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे.