कोरोना योद्धे होण्यासाठी युवक, युवतीही सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST2021-05-01T04:19:56+5:302021-05-01T04:19:56+5:30

पारनेर : कोविडसारख्या महामारीमध्ये कोणीतरी पुढे आलेच पाहिजे, आम्ही देशसेवाच करण्यासाठी आलोय असा मनाशी निर्धार करीत पारनेर तालुक्यातील २०० ...

Young men and women rushed to become Corona warriors | कोरोना योद्धे होण्यासाठी युवक, युवतीही सरसावले

कोरोना योद्धे होण्यासाठी युवक, युवतीही सरसावले

पारनेर : कोविडसारख्या महामारीमध्ये कोणीतरी पुढे आलेच पाहिजे, आम्ही देशसेवाच करण्यासाठी आलोय असा मनाशी निर्धार करीत पारनेर तालुक्यातील २०० युवक, युवतींनी कोरोना योद्धे होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

भाळवणी, पारनेर येथे कोविड सेंटर आहेत. तसेच शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्देशानुसार तहसील कार्यालय त तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी नुकतेच बीएएमएस डॉक्टर, वॉर्डबॉय, परिचारिका, डेटा ऑपरेटर, औषध निर्माण अधिकारी यासह विविध प्रकारच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविले होते. मागील आठवड्यात त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी २०० युवक, युवतींनी उपस्थिती दर्शवली. त्यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला.

नर्सिंग शिक्षण झालेल्या पारनेरच्या सारिका चेडे, प्रगती औटी म्हणाल्या, सध्या शासनाला गरज आहे. त्यामुळे आम्ही सेवा म्हणून कोविड सेंटरला काम करणार आहोत. करंदीचा विशाल औटी, अतुल भांबरे, निघोजचा विशाल डावभट, तुषार सोनवणे, ज्योती कांबळे म्हणाले, घरी बसून राहण्यापेक्षा आपला समाजाला उपयोग होत आहे.

अमोल पुंड, आकाश कोकाटे नेवासा तालुक्यातून आले आहेत. ते म्हणाले, भाळवणीच्या कोविड सेंटरमध्ये मामा ॲडमिट आहे. त्याला मदत होईल आणि आमच्याकडून देशसेवा होईल, असे त्यांनी सांगितले. नर्सिंगच्या सुनयना साळवे-वनकुटे, सुमित्रा कवाद-निघोज, माया झगडे- रूई छत्रपती म्हणाले, आम्ही नर्सिंगचे शिक्षण घेतानाच आरोग्यसेवेचे व्रत घेतले आहे. त्यामुळे महामारीला घाबरून जाण्यापेक्षा महामारीत आरोग्य सेवा महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही कोविड सेंटरमध्ये काम कतोय. डी.फार्म., एम.फार्म. शिक्षण घेतलेलेसुद्धा काहीजण या सेवेत आहेत, असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.

---

एकीकडे सैन्य भरतीसाठी सराव, दुसरीकडे कोविड सेंटरला ड्युटी

धोत्रे गावचा नवनाथ भांड युवक भेटला. सैन्यात जाऊन देशासाठी सेवा करण्याचे ध्येय गाठण्यासाठी दररोज सराव करतोय. कोविड सेंटरमध्ये सेवा करणे हीसुद्धा देशसेवाच आहे. म्हणून, इथे महामारीत सेवा करायला आलो, असे उच्च शिक्षण घेतलेला नवनाथ भांड व त्याचे मित्र ढवळपुरीचा किरण थोरात, राहुल खोमणे, कुंदन सासवडे, आकाश नाईकवाडी सांगत होते.

---

पारनेर तालुक्यातील कोरोना महामारीत सुरू असलेल्या कोविड सेंटर व आरोग्य केंद्रात मनुष्यबळ कमी असल्याने युवकांची भरती केली होती. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यात बीएएमएस डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत.

- ज्योती देवरे,

तहसीलदार, पारनेर

Web Title: Young men and women rushed to become Corona warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.