बेलगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 16:01 IST2020-06-24T16:00:49+5:302020-06-24T16:01:15+5:30
कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील एका तरूणाने चिक्कूच्या झाडाला गळ्यातील पंचा लटकवून गळफास घेऊन सोमवारी (२२ जून) आत्महत्या केली.

बेलगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
मिरजगाव : कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील एका तरूणाने चिक्कूच्या झाडाला गळ्यातील पंचा लटकवून गळफास घेऊन सोमवारी (२२ जून) आत्महत्या केली.
पोपट मल्हारी पोकळे (वय ३०) असे या तरुणांचे नाव आहे. घरासमोरील शेतात त्याने सोमवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी, आई-वडील भाऊ असा परिवार आहे.
सागर साहेबराव पोकळे यांच्या फिर्यादीनुसार मिरजगाव दूरक्षेत्रात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास हे.कॉ. प्रबोध हंचे करीत आहेत. युवकाच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.