...तुम्ही भूमिपूजन केले आहे, रस्ता ही दर्जेदार करा..., अण्णा हजारे यांचा खासदार सुजय विखे यांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 11:19 IST2021-01-10T11:18:21+5:302021-01-10T11:19:58+5:30

अळकुटी-निघोज-राळेगण थेरपाळ-गव्हाणवाडी रस्त्याच्या कामाबाबत तक्रारी येत आहेत, तुम्ही रस्त्याचे भूमिपूजन केले आहे. यामुळे रस्ताही दर्जेदार करून घ्या, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी खासदार सुजय विखे यांना दिला.

... You have done Bhumi Pujan, make the road quality ..., Anna Hazare advises MP Sujay Vikhe | ...तुम्ही भूमिपूजन केले आहे, रस्ता ही दर्जेदार करा..., अण्णा हजारे यांचा खासदार सुजय विखे यांना सल्ला

...तुम्ही भूमिपूजन केले आहे, रस्ता ही दर्जेदार करा..., अण्णा हजारे यांचा खासदार सुजय विखे यांना सल्ला

पारनेर : अळकुटी-निघोज-राळेगण थेरपाळ-गव्हाणवाडी रस्त्याच्या कामाबाबत तक्रारी येत आहेत, तुम्ही रस्त्याचे भूमिपूजन केले आहे. यामुळे रस्ताही दर्जेदार करून घ्या, असा सल्ला ज्येष्ठ  समाजसेवक अण्णा हजारे यांनी खासदार सुजय विखे यांना दिला.

   पारनेर तालुक्यातून अळकुटी-निघोज-जवळा-राळेगण थेरपाळ-गव्हाणवाडी या मार्गावरील रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत काम सुरू आहे. यामध्ये कामामध्ये मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत आहेत. याबाबत  ज्येष्ठ  समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे सुध्दा याची तक्रार आली होती. शनिवारी खासदार सुजय विखे, आमदार गिरीश महाजन राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांना भेट घेतल्यावर विखे यांच्याकडे या रस्त्याच्या कामाविषयी अण्णांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय तुम्ही भूमिपूजन केल्याची आठवण करून दिली.

    यावेळी खासदार सुजय विखे म्हणाले, त्या रस्त्याच्या ठेकेदाराला बोलावून घेऊन दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही असे सांगितले. यावेळी अण्णा हजारे म्हणाले, रस्ता चांगला झाल्यास त्याचा उपयोग आपल्या भागातील लोकांनाच होणार आहे.

Web Title: ... You have done Bhumi Pujan, make the road quality ..., Anna Hazare advises MP Sujay Vikhe