महालक्ष्मी हिवरे येथील खंडोबाची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:37 IST2020-12-12T04:37:27+5:302020-12-12T04:37:27+5:30
नेवासा : नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील खंडोबाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ...

महालक्ष्मी हिवरे येथील खंडोबाची यात्रा रद्द
नेवासा : नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील खंडोबाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरवर्षी चंपाषष्ठीनिमित्त येथे यात्रा भरविली जात असल्याने विविध भागांतील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सवादरम्यान होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय पालखी मंडळ, यात्रा समिती, ग्रामपंचायत प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. यावेळी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांच्यासह पालखी मंडळाचे व यात्रा समितीचे सदस्य, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. चंपाषष्ठीनिमित्त होणारी पालखी मिरवणूक, कावड मिरवणूक, जलाभिषेक, देव ओवाळणी, जागरण, गोंधळ, नाटक, लोकनाट्य तमाशा, शोभेच्या दारूची आतषबाजी, कलाकारांच्या हजेऱ्या, कुस्त्यांचा हंगामा व इतर सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.