जामखेड तालुक्यात बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 18:31 IST2020-02-05T18:30:40+5:302020-02-05T18:31:48+5:30
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील अरणेश्वर विद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेली आकांक्षा किशोर ससाणे (वय १७) हिने राहत्या घराच्या पाठिमागील पत्र्याच्या खोलीत ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

जामखेड तालुक्यात बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
जामखेड : तालुक्यातील अरणगाव येथील अरणेश्वर विद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेली आकांक्षा किशोर ससाणे (वय १७) हिने राहत्या घराच्या पाठिमागील पत्र्याच्या खोलीत ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अरणगाव येथील उमेश शामराव ससाणे यांनी पोलिसात घटनेची माहिती दिली आहे. पुतणी आकांक्षा किशोर ससाणे हिने मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घराच्या पाठिमागील पत्र्याच्या खोलीत ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ती इयत्ता बारावीमध्ये अरणगाव येथील अरणेश्वर विद्यालयात शिक्षण घेत होती. नुकतीच तिने प्रॅक्टीकल परीक्षा दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकली नाही.