‘श्रमिक’चे शिक्षणाचे कार्य अविरत सुरू राहील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:45+5:302020-12-13T04:34:45+5:30
एमएचटी-सीईटी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते. व्यासपीठावर शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव अनिल राठी, जसपाल डंग, ...

‘श्रमिक’चे शिक्षणाचे कार्य अविरत सुरू राहील
एमएचटी-सीईटी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते. व्यासपीठावर शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव अनिल राठी, जसपाल डंग, राजकुमार गांधी, संतोष करवा, नंदनमल बाफना, श्रीहरी नावंदर, सचिन पलोड, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भालचंद्र भावे, उपप्राचार्य डॉ राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा. अप्पासाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते. वैष्णवी पाबळकर ही विद्यार्थिनी एमएचटी-सीईटी परीक्षेमध्ये ९९.७६ पर्सेंटाइल स्कोअर मिळवून संगमनेर तालुक्यात प्रथम आली आहे. जेईई-अॅडव्हान्स ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आयसर पुणे येथे तिला प्रवेश मिळाला आहे.
भविष्यात श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय हे गुणवत्तेच्या बाबतीत ब्रँड ठरावे. विज्ञान व वाणिज्य शाखेप्रमाणेच कला शाखेकडेही गुणवंत विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसतो आहे. मराठी, इंग्रजी, संस्कृत, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांमध्येसुद्धा करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत, असेही डॉ. मालपाणी म्हणाले.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. ढमक यांनी, तर सूत्रसंचालन प्रा.शरद सावंत यांनी केले. पर्यवेक्षक प्रा. अप्पासाहेब गुंजाळ यांनी आभार मानले.