रणरागिणी उतरल्या रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 17:37 IST2017-08-22T17:32:20+5:302017-08-22T17:37:05+5:30
बोटा : शेतकºयांनी संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सरसकट शैक्षणिक कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव व मुलींना मोफत शिक्षण यांसह विविध मागण्यांसाठी संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणरागिणी मंगळवारी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.

रणरागिणी उतरल्या रस्त्यावर
ठळक मुद्देनाशिक-पुणे महामार्गावर चक्काजाम: एकच नारा सातबारा कोरा
ब टा : शेतकºयांनी संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सरसकट शैक्षणिक कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव व मुलींना मोफत शिक्षण यांसह विविध मागण्यांसाठी संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणरागिणी मंगळवारी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. नाशिक-पुणे महामार्गावर या महिलांनी मंगळवारी सकाळी यासाठी चक्का जाम आंदोलन केले. यावेळी ‘एकच नारा सातबारा कोरा’ यासारख्या घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. घारगाव (ता. संगमनेर) येथे शेतकरी, महिला व विद्यार्थी यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकºयांच्या लेकींनी हे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेतले. संगमनेर पंचायत समितीच्या सदस्या प्रियंका गडगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनापूर्वी प्रियंका गडगे, घारगावच्या सरपंच सुरेखा आहेर, नांदूर खंदरमाळच्या सरपंच सुनंदा भागवत, आंबीदुमालाच्या सरपंच भाग्यश्री नरवडे, श्रद्धा गाडेकर, पल्लवी कान्होरे, लीलावती गडगे, सुजाता गाडेकर, अश्विनी गाडेकर यांनी आवेशपूर्ण भाषणे करीत शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्या व्यथा मांडल्या. शेतकरी व विद्यार्थ्यांची संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, बिनव्याजी शैक्षणिक कर्ज, बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण या मागण्या त्यांनी भाषणातून केल्या. यावेळी उपसरपंच संदीप आहेर, आनंदा गाडेकर, तुळशीराम भोर, दत्तात्रय कान्होरे उपस्थित होते. नाशिक-पुणे महामार्गावर उतरून या रणरागिणींनी चक्का जाम आंदोलन केले. यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी घारगावचे मंडलाधिकारी जी. के. कडलग यांनी महिलांच्या या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी चोख बंदोबस्त होता. महामार्गावर वाहनांच्या रांगानाशिक-पुणे महामार्गावर चक्काजामएकच नारा सातबारा कोरा