महिलांनी आहारात रानभाज्यांचा वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST2021-08-15T04:23:20+5:302021-08-15T04:23:20+5:30
यावेळी आत्माचे उपप्रकल्प संचालक डॉ. राजाराम गायकवाड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब ...

महिलांनी आहारात रानभाज्यांचा वापर करावा
यावेळी आत्माचे उपप्रकल्प संचालक डॉ. राजाराम गायकवाड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचे सल्लागार उल्हास बोरसे, राहाता पंचायत समितीचे उपसभापती ओमेश जपे, माजी सभापती बबलू म्हस्के, बाभळेश्वरच्या सरपंच विमलताई म्हस्के, आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक किशोर कडू राजदत्त गोरे, कृषी अधिकारी पुरुषोत्तम कात्रजकर उपस्थित होते. प्रारंभी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी स्वागत केले.
विखे म्हणाल्या, आज निसर्गशेती आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढत आहे. रानभाज्या आणि औषधी गुणधर्म यामध्ये जास्त आहेत. महिलांनी परसबागेत रानभाज्यांची लागवड करून त्याचे पुढील पिढीसाठी जतन करावे आणि आहारात त्याचा वापर करावा, असे सांगतानाच कोरोना संकट कायम आहे, आपण आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. रान महोत्सवामध्ये २५ ते ३० रानभाज्यांचे महत्त्व प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यमन पुलाटे यांनी तर आभार किशोर कडू यांनी मांडले.