महिलांनी सावित्रीबाई फुलेंचे विचार जोपासावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:06 IST2021-01-08T05:06:13+5:302021-01-08T05:06:13+5:30
राष्ट्र सेवा दलाच्या वतीने सावित्रीच्या लढवय्या लेकींनी शहरातील सर्वोदय छात्रालय प्रांगणात रविवारी सावित्रीबाई फुले जयंती उत्सव साजरा केला. यावेळी ...

महिलांनी सावित्रीबाई फुलेंचे विचार जोपासावेत
राष्ट्र सेवा दलाच्या वतीने सावित्रीच्या लढवय्या लेकींनी शहरातील सर्वोदय छात्रालय प्रांगणात रविवारी सावित्रीबाई फुले जयंती उत्सव साजरा केला. यावेळी सावंत बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे रजनी टिभे, भरती महाले, राष्ट्र सेवा दलाच्या तालुकाध्यक्ष सुनंदा मेढे, साहित्यिक प्रा. बी. एम. महाले, विनय सावंत, प्रा. बिना सावंत, उर्मिला आव्हाड, लक्ष्मण आव्हाड, सुभानभाई शेख, संजय शिंदे, बाळासाहेब भोर, सुभाष कानवडे, अमोल आरोटे, विशाल पगारे, पूनम डहाळे, मंगल कर्णिक, सविता माघाडे, शाहीन शेख, मंगल मालुंजकर आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांसह आरोग्यसेविका, आशा व अंगणवाडी कर्मचारी, सफाई कामगार यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.यात डॉ. सुरेखा पोपेरे, वनक्षेत्रपाल भाग्यश्री पोले, पोलीस चारुशीला गोंदके, वायरमन मनीषा तोरमल, एस. टी. कंडक्टर धनश्री बांबळे, कृषी सहायक संध्या बांबळे यांचा गौरव करण्यात आला. पूनम कदम यांनी प्रास्ताविक केले. तेजस्विनी माघाडे यांनी सूत्रसंचालन केले.
...
०४अकोले फुले जयंती
...
ओळी-अकोले येथे सर्वोदय छात्रालय प्रांगणात रविवारी सावित्रीबाई फुले जयंती उत्सव साजरा केला. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांसह आरोग्यसेविका, आशा व अंगणवाडी कर्मचारी, सफाई कामगार यांचा सन्मान करण्यात आला.