जळगाव जिल्ह्य़ातील ऊस तोडणी मजुर महिलेची श्रीगोंद्यात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:10 IST2021-01-23T18:09:38+5:302021-01-23T18:10:22+5:30
श्रीगोंदा तालुक्यात तांदळी येथे शेतात उसतोड करणाऱ्या मजुराच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २२ जानेवारी रोजी सकाळी घडली.

जळगाव जिल्ह्य़ातील ऊस तोडणी मजुर महिलेची श्रीगोंद्यात आत्महत्या
श्रीगोंदा : तालुक्यात तांदळी येथे शेतात उसतोड करणाऱ्या मजुराच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २२ जानेवारी रोजी सकाळी घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तांदळी येथील शेतकरी चांदभाई गुलाब शेख यांच्या मोकळ्या शेतामध्ये पालं टाकून राहत असलेले, दिनकर शंकर चव्हाण (राहणार तळवण तांडा, ता.भडगाव, जि.. जळगाव) हे भाऊ व पत्नी सह नमूद ठिकाणी मागील दोन महिन्यांपासून राहत होते. दिनकर व त्याच्या पत्नी मध्ये झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.