विजेचा धक्क्याने वायरमनचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 14:34 IST2020-10-03T14:33:42+5:302020-10-03T14:34:06+5:30
खांबावर वीज दुरुस्तीचे काम करीत असताना वीजवाहक तारेचा धक्का बसून वायरमनचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कर्जत तालुक्यातील कानगुडवाडी येथे शुक्रवारी सकाळी (दि.२) घडली.

विजेचा धक्क्याने वायरमनचा मृत्यू
राशीन : खांबावर वीज दुरुस्तीचे काम करीत असताना वीजवाहक तारेचा धक्का बसून वायरमनचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कर्जत तालुक्यातील कानगुडवाडी येथे शुक्रवारी सकाळी (दि.२) घडली.
कुंडलिक ज्ञानदेव कानगुडे (वय ३७) असे मृत पावलेल्या वायरमनचे नाव आहे. ते राशीन येथील महावितरण कंपनीमध्ये ठेकेदारामार्फत कॉन्ट्रॅक्ट बेसवर वायरमन म्हणून कार्यरत होते.
शुक्रवारी सकाळी वीज दुरूस्तीसाठी कानगुडे हे खांबावर चढले. काम चालू असताना खांबावरील वीज वाहक तारांमधून त्यांना विजेचा धक्का बसला. ते खांबावरून खाली कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.