निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:15 IST2021-07-19T04:15:33+5:302021-07-19T04:15:33+5:30
निकाळजे म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची स्थापना १९९० साली झाली. या पक्षात मी गेल्या २२ वर्षांपासून काम करत ...

निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देणार
निकाळजे म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची स्थापना १९९० साली झाली. या पक्षात मी गेल्या २२ वर्षांपासून काम करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीनुसार काम करत आहे. नगर जिल्ह्यात पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी देऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या पक्षात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात संघटित होत आहे. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांने सामाजिक कार्यात योगदान द्यावे, अशी आमची भूमिका आहे. असे ते म्हणाले. यावेळी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, मुंबई युवक अध्यक्ष अक्षय निकाळजे, युवक महाराष्ट्र अध्यक्ष अमित वर्मा, राजाभाऊ कटारनवरे, मंगेश जाधव, दादासाहेब ओहोळ, दक्षिण जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब पगारे, उतरचे अध्यक्ष शशी दारोळे राकेश कापसे, नगर शहराध्यक्ष हरिभाऊ अल्हाट, उत्तर युवा जिल्हाध्यक्ष रॉकी लोंढे, उत्तर महाराष्ट्र सचिव महेश सुरडकर, नगर जिल्हा अध्यक्ष राजन ब्राह्मणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
--------------
फोटो १८ पत्रकारपरिषद
ओळी- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी नगर येथे माध्यमांशी संवाद साधला.