विहिरीत उडी मारलेल्या पतीला वाचविताना पत्नीचाही मृत्यू; बहीण बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 11:43 IST2020-06-28T11:42:25+5:302020-06-28T11:43:09+5:30

पती-पत्नीत झालेल्या किरकोळ वादातून पतीने थेट घराजवळच असलेल्या विहिरीत उडी मारली. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या पत्नीने व बहिणीने ही विहीरीत उडी मारली. यात पती-पत्नी या दोघांचाही दुर्दैर्वी मृत्यू झाला. तर बहिणाला दोरीच्या साह्याने वर काढल्याने तिचा जीव वाचला आहे.

Wife also killed while rescuing husband who jumped into a well; Sister rescued | विहिरीत उडी मारलेल्या पतीला वाचविताना पत्नीचाही मृत्यू; बहीण बचावली

विहिरीत उडी मारलेल्या पतीला वाचविताना पत्नीचाही मृत्यू; बहीण बचावली

कोपरगाव : पती-पत्नीत झालेल्या किरकोळ वादातून पतीने थेट घराजवळच असलेल्या विहिरीत उडी मारली. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या पत्नीने व बहिणीने ही विहीरीत उडी मारली. यात पती-पत्नी या दोघांचाही दुर्दैर्वी मृत्यू झाला. तर बहिणाला दोरीच्या साह्याने वर काढल्याने तिचा जीव वाचला आहे.

शनिवारी (दि.२७) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरातील रेलवाडी येथे ही घटना घडली आहे. या घटनेतील  ज्ञानेश्वर तुकाराम खोतकर (वय ३०), कविता ज्ञानेश्वर खोतकर (वय २५, दोन्ही रा.रेलवाडी, कोकमठाण कोपरगाव ) अशी मृतांची नावे आहे. तर जनाबाई खोतकर असे जीव वाचलेल्या बहिणीचे नाव आहे. तिच्या पायाला दुखापत झाली आहे.

याप्रकरणी मयत ज्ञानेश्वरचे वडील तुकाराम कचरू खोतकर ( वय ६० रा. रेलवाडी, कोकमठाण, कोपरगाव ) यांच्या खबरीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: Wife also killed while rescuing husband who jumped into a well; Sister rescued