अरिहंत भगवान मूर्तीच्या महाकाय शिलेचे नगरमध्ये स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:43+5:302021-06-02T04:17:43+5:30

यावेळी जैन समाजाचे अध्यक्ष महावीर बडजाते, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, रवींद्र बाकलवाल, संजय चोपडा, वसंत लोढा, किरण मणियार, संजय कासलीवाल, ...

Welcome to the city of the huge stone of Arihant Bhagwan idol | अरिहंत भगवान मूर्तीच्या महाकाय शिलेचे नगरमध्ये स्वागत

अरिहंत भगवान मूर्तीच्या महाकाय शिलेचे नगरमध्ये स्वागत

यावेळी जैन समाजाचे अध्यक्ष महावीर बडजाते, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, रवींद्र बाकलवाल, संजय चोपडा, वसंत लोढा, किरण मणियार, संजय कासलीवाल, अभिजित खोसे, नंदलाल गंगवाल, भारत चुडीवाल, विनय बिनायके, कुशल पांडे, रवी कासलीवाल, संजय महाजन, महावीर गोसावी, विजय औटी, संजय पहाडे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित भाविकांनी सामूहिक शांतीमंत्राचे पठण करत महाकाय शिलेस पुष्पहार घालून स्वागत केले. महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, प्रा. माणिक विधाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनीही नगरकरांच्यावतीने या शिलेचे स्वागत केले. प.पू. ज्ञानयोगी प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य देवनंदी गुरुदेव यांच्या संकल्पनेमधून नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे नमोकार तीर्थ साकारत आहे. या पवित्रस्थळी अरिहंत भगवान मूर्तीची प्रतिष्ठापना श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली यांच्या मूर्तीच्या धर्तीवर करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी कर्नाटकमधील बेंगलोर जवळील देवनहळ्ळी येथून हा ३६५ टन वजनाचा क्रिम कलरचा ग्रेनाईड पाषाण १४४ टायरच्या ट्रेलरमधून आणण्यात आला आहे. हैदराबाद, सोलापूर, मोहोळ, मोडलिंब, टेंभुर्णी, करमाळामार्गे मंगळवारी सकाळी नगर शहरातील बायपास चौकात या महाकाय शिलेचे आगमन झाले.

........

पाषाण कोरण्यासाठी लागले तीन महिने

ही महाकाय शिला घेऊन जात असलेल्या ट्रेलरचे मालक व चालक कुलदीपसिंह यांनी सांगितले की, देवणहळ्ळीजवळच्या छप्पडकल्ल तलावाच्या पाण्यातून हा पाषाण कोरण्यासाठी तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लागला. तेथून मुख्य रस्त्यावर आणण्याकरिता तीन दिवस गेले. चार मोठ्या क्रेनच्या सहाय्याने ही शिला ट्रेलरवर विराजमान करण्यात आली. नऊ जणांची आमची टीम ही शिला घेऊन जात आहे. १३०० किलोमीटरचे अंतर ४० दिवसात पार करून चांदवडला पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.

..........

फोटो -०१शीला

ओळ - अरिहंत भगवान मूर्तीसाठीची अखंड शिला नगर शहरालगतच्या बायपास चौकात सोलापूर रोडमार्गे आली असता नगर शहरातील भाविकांनी या महाशिलेचे स्वागत केले.

Web Title: Welcome to the city of the huge stone of Arihant Bhagwan idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.