सभासदांना वेड्यात काढण्याचे काम आपण कधीच करत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST2021-09-08T04:26:48+5:302021-09-08T04:26:48+5:30

संगमनेर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने आजपर्यंत अनेक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. परंतु केलेल्या कामाची प्रसिद्धी कधी ...

We never drive members crazy | सभासदांना वेड्यात काढण्याचे काम आपण कधीच करत नाही

सभासदांना वेड्यात काढण्याचे काम आपण कधीच करत नाही

संगमनेर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने आजपर्यंत अनेक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. परंतु केलेल्या कामाची प्रसिद्धी कधी केली नाही. छोट्याशा कामाची मोठी प्रसिद्धी करत सभासदांना वेड्यात काढण्याचे काम आपण कधीच करत नाही. आपण केवळ कामे करण्यावर भरत देतो, असे अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे म्हणाले.

सोमवारी (दि. ०६) संगमनेरात तालुक्यातील नवनियुक्त जिल्हा संघ व गुरुमाऊली मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळ, संगमनेर यांच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष विठ्ठल फुंदे होते. शिक्षक बँकेचे अध्यक्ष सलीम पठाण, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे, शिक्षक संघाचे संगमनेर तालुकाध्यक्ष सुनील ढेरंगे आदी यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर जिल्हा संघाच्या विविध समित्यांवर संगमनेर तालुक्यातून नियुक्ती मिळालेल्या पी. डी. सोनवणे, अंजली मुळे, अशोक गिरी, शंकर भोसले, भाऊराव राहिंज, दिनकर सागर, जालिंदर बढे, प्रदीप राहाणे, सुभाष औटी, राजू आव्हाड, सविता दिवेकर, शारदा ढमक, राजश्री कथले, विजया पगार, भाग्यश्री बडदे, शलाका मराठे, प्रीती खालकर, रामनाथ कार्ले, एकनाथ लोंढे, शांताराम कचरे, नारायण सुपेकर, सुनील घुले, संजय गोर्डे, परवीन शेख या पदाधिकाऱ्यांचा जिल्हा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सूर्यकांत काळे, शशिकांत जेजुरकर, शकील बागवान, अण्णासाहेब आभाळे, सयाजी राहाणे, सोमनाथ गळंगे, कैलास सहाणे, केशव घुगे, प्रकाश शिंदे, निवृत्ती भागवत, सुरेश नगरे, सुभाष राहाणे, सुनील पवार, लहानभाऊ सहाणे, प्रवीण वाकचौरे, संजय शेंडगे, संतोष कुलाळ, विनोद उकिर्डे, गीता बाप्ते, सुरेखा आंधळे, अनिता माळी उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षक संघाचे संगमनेर तालुकाध्यक्ष ढेरंगे यांनी केले. सूत्रसंचालन केशव घुगे व निवृत्ती भागवत यांनी केले. अशोक गिरी यांनी आभार मानले.

Web Title: We never drive members crazy