भोसे खिंड बोगद्यातून सीना धरणात पाणी : पालकमंत्र्यांनी घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 17:44 IST2018-08-17T17:44:26+5:302018-08-17T17:44:30+5:30
भोसेखिंड बोगद्याद्वारे कुकडीचे पाणी सीना धरणात गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सोडण्यात आले. तालुक्यात कुकडीचे आर्वतन सुरू झाल्यानंतर सीना धरणात कुकडीचे पाणी सोडण्याची मागणी होत होती.

भोसे खिंड बोगद्यातून सीना धरणात पाणी : पालकमंत्र्यांनी घेतली दखल
मिरजगाव : भोसेखिंड बोगद्याद्वारे कुकडीचे पाणी सीना धरणात गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सोडण्यात आले.
तालुक्यात कुकडीचे आर्वतन सुरू झाल्यानंतर सीना धरणात कुकडीचे पाणी सोडण्याची मागणी होत होती. त्यापूर्वीच पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी सीना धरणात पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. गुरूवारी पालकमंत्री प्रा. शिंदे नगर येथील स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम आटोपून चौंडीकडे जात असताना मिरजगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपत बावडकर यांच्या निवासस्थानी थांबले होते. यावेळी परिसरातील शेतकºयांनी पाऊस लांबल्याने पिके वाया जात असल्याची कैफियत मांडली. पालकमंत्र्यांनी सीना धरणाची स्थिती पाटबंधारे अधिकाºयांकडून समजावून घेतली. त्यानंतर तातडीने सीना धरणात कुकडीचे पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे रात्री साडे दहाच्या सुमारास १२५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्याचा वेग वाढविण्यात येणार आहे. यामुळे सीना धरणातील पाणी साठ्यात वाढ होणार आहे. या आवर्तनातून मिळणाºया पाण्यावर सीना धरणातून उजव्या कालव्यातून आर्वतन सोडण्याचा निर्णय घेतला जाईल असे पालकमंत्र्यांन सांगितले.