शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईप्रश्नी हंडामोर्चा,ठिय्या

By admin | Updated: January 12, 2016 23:34 IST

पाथर्डी : टाळ-मृदुंगाच्या जयघोषात भजन करून तहसीलदार व शासनाचा निषेध करीत ढाकणवाडी येथे टँकरने पिण्याचे पाणी पुरवावे, रोजगार हमीची कामे सुरू करावी,

पाथर्डी : टाळ-मृदुंगाच्या जयघोषात भजन करून तहसीलदार व शासनाचा निषेध करीत ढाकणवाडी येथे टँकरने पिण्याचे पाणी पुरवावे, रोजगार हमीची कामे सुरू करावी, या मागणीसाठी संतप्त महिला व ग्रामस्थांनी मंगळवारी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन ठिय्या दिला. आंदोलकांनी दिलेल्या घोषणांमुळे तहसील कार्यालय दणाणून सोडले होते. पाथर्डी पंचायत समितीे सदस्य देविदास खेडकर, अविनाश पालवे, सरपंच राजेंद्र ढाकणे, नामदेव खेडकर, भरत ढाकणे, कमल ढाकणे, गंगुबाई ढाकणे, साखरबाई ढाकणे, शकुंतला ढाकणे, आसराबाई वारे, भागुबाई बेंद्रे, बाळासाहेब ढाकणे, माणिक ढाकणे, गोरक्ष ढाकणे यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन प्रशासनाचा धिक्कार केला. ढाकणवाडी येथे पिण्याचे पाणी टँकरने पुरवावे, यासाठी डिसेंबर महिन्यात प्रस्ताव दिला होता. गावात पाणी नसताना अधिकारी टँकर देण्यास टाळाटाळ करतात, असे सांगून सरपंच राजेंद्र ढाकणे यांनी सोमवारी ढाकणवाडी ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले. उपोषणाकडे तलाठी वगळता कोणताही अधिकारी फिरकला नाही. महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन प्रशासनाचा धिक्कार केला. आंदोलनापूर्वी पाच मिनिटे अगोदरच तहसीलदार कार्यालयाबाहेर निघून गेल्या.या घटनेचा आंदोलनकर्त्यांनी निषेध केला. (तालुका प्रतिनिधी) तहसीलदारांचा काढता पाय रोजगार हमीचे अव्वल कारकून राजेंद्र कळसकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. सहायक गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे यांनी ढाकणवाडीत रोजगार हमीचे काम सुरू करण्यात येईल, असे सांगितले. तहसीलदार सुनीता जऱ्हाड आंदोलन सुरू होण्यापूर्वी कार्यालयातून निघून गेल्या. तहसीलदारांनी आंदोलनाचा धसका घेत निघून गेल्या. अशा अधिकाऱ्यांचा निषेध करतो, असे ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी यावेळी सांगितले. आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. पाणी टंचाईमुळे होणारे हाल सांगून गावाला टँकर सुरु होण्यास होणाऱ्या दिरंगाईबद्दल यावेळी संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती. या महिला रिकामे हंडे घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.