मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावले; नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 14:43 IST2020-09-01T14:43:19+5:302020-09-01T14:43:29+5:30
26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाच्या अकरा मोरया द्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला. धरणाकडे 3000 पाण्याची आवक सुरू आहे.

मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावले; नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण
राहुरी (जि. अहमदनगर) : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणातून आज सकाळी दहा वाजता 11 मो-याद्वारे 2000 क्युसेकने जायकवाडीकडे पाणी झेपावले. मुळा पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी कळ दाबल्यानंतर पाणी सोडण्यात आले.
26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाच्या अकरा मोरया द्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला. धरणाकडे 3000 पाण्याची आवक सुरू आहे. मुळा धरणावर असलेला भोंगा वाजवल्यानंतर पाणी सोडण्यात आले. मुळा धरणातून पाणी विसर्ग सुरू झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी यापूर्वीच काढून ठेवल्या आहेत. मुळा धरणातून पाणी सोडल्यामुळे विहिरीचे पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे मुळा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात आज अखेल 25 हजार 500 इतका पाणी साठा असुन 3 हजार क्युआने आवक सुरू असुन नदिपाञात दोन हजार क्युसेक ने, डाव्या कालव्याद्वारे मुसळवाडी तलावात 150 क्युसेक तर उर्जा निमिर्तीसाठी उजव्या कालव्याद्वारे 500 क्युसेक ने पाणी सोडल्यात आले. -सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे अहमदनगर