चौकीदाराने चो-या करण्यासाठी कुलूप उघडून दिले - राधाकृष्ण विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 18:44 IST2018-09-25T16:04:55+5:302018-09-25T18:44:37+5:30
देशाच्या चौकीदाराने मुठभर भांडवलदारांना चौरी करण्यासाठी कुलूप उघडून दिले आहे, अशी टिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी येथे केला.

चौकीदाराने चो-या करण्यासाठी कुलूप उघडून दिले - राधाकृष्ण विखे
अहमदनगर: आघाडी सरकारच्या काळात ५६० कोटींवर होणारी विमान खरेदी आता एकदम सोळाशे कोटींवर कशी गेली, असा सवाल उपस्थित करत देशाच्या चौकीदाराने मुठभर भांडवलदारांना चौरी करण्यासाठी कुलूप उघडून दिले आहे, अशी टिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी येथे केला.
विरोधी पक्षनेते विखे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यायालयावर काँग्रेसच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला मोर्चा बंगाली चौकीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर सभेत रुपांतर झाले. त्यावेळी विखे बोलत होते. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, शहराध्यख निखील वारे, आदी यावेळी उपस्थित होते.