शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचलला टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
3
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
4
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
5
हंटाव्हायर बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
6
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
7
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
8
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
9
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
10
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
11
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
12
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
13
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
14
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
15
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
16
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
17
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
18
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
19
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
20
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वारी नाही.. जीवनातील चैतन्याचा ठेवाच संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

श्रीगोंदा : पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत।। व्रत एकादशी करीन उपवासी। गाईन अहर्निशी मुखी नाम।। ...

श्रीगोंदा :

पंढरीची वारी आहे माझे घरी।

आणिक न करी तीर्थव्रत।।

व्रत एकादशी करीन उपवासी। गाईन अहर्निशी मुखी नाम।।

नाम विठोबाचे घेईन मी वाचे।

बीज कण्यांतीचे तुका म्हणे।।

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे पंढरीऱ्या पायी वारीचा आनंद असंख्य वारकरी घेत असतात. यातून भक्ती-शक्ती उत्सवाचा जागर होतो. तसेच श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथील वारकरी महादेव गणपत शेंडगे हे ३८ ते ४० वर्षे श्रीगोंदा ते पंंढरपूर आषाढी वारीचा आनंद लुटत आहेत. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षांपासून पायी वारी बंद झाली. त्यामुळे जीवनातील चैतन्याचा ठेवाच संपला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

महादेव गणपत शेंडगे यांची परिस्थिती बेताचीच होती. मात्र, घरात पांडुरंगाच्या नामाचा जागर कायम होत असे. अशा परिस्थितीत महादेव शेंडगे यांनी २८ व्या वर्षापासून श्रीगोंद्याचे तात्या महाराज महापुरुष पायी दिंडी सोहळ्यातून पायी वारी करण्यास सुरुवात केली. काही वर्षे ढोरजेचे गोवर्धन महाराज गाडे यांच्या दिंडी सोहळ्यात भाग घेतला. पंढरीच्या भेटीची आस दर वारीत पूर्ण होत होती. अध्यात्मिक विचारातून मुलांवर संस्कार झाले. सारे घर शाकाहारी झाले. अध्यात्मिक व शैक्षणिक विचारातून कुटुंबाला प्रगतीची दिशा मिळाली, असे शेंडगे यांनी सांगितले. पंढरीच्या वारीतून चांगल्या विचाराची माणसे जोडली गेली. गावोगावची माणसे, प्रथा, रिती समजले. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून वारी बंद आहे. त्यामुळे आमचे आयुष्य दहा वर्षांनी कमी झाल्यासारखे वाटते. कधी कोरोना जाईल पुन्हा वारीचा जागर होईल. पायी वारी करून विठुरायाचे दर्शन होईल याची प्रतीक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.