शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव तांदळीत मद्यसाठा जप्त

By admin | Updated: September 23, 2014 23:02 IST

अहमदनगर: तालुक्यातील वडगाव तांदळी परिसरात हॉटेलमध्ये विनापरवाना ३६ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा आढळून आला.

अहमदनगर: तालुक्यातील वडगाव तांदळी परिसरात हॉटेलमध्ये विनापरवाना ३६ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा आढळून आला. या हॉटेलवर नगर तालुका पोलिसांनी छापा घातला. या प्रकरणी हॉटेलमालकावर बेकायदा दारु विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नगर तालुक्यातील वाळकी ते राळेगण म्हसोबा या रोडवरील हॉटेल दिनामध्ये बेकायदा मद्यसाठा असल्याची माहिती पोलीस अधीक्षक लखमी गौतम, पोलीस उपअधीक्षक महेरे (ग्रामीण) यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी एक पथक तयार करून मंगळवारी हॉटेलवर छापा घातला. दिना हॉटेलकडे हॉटेल चालविण्याचा कोणताही परवाना आढळून आला नाही. या हॉटेलची झडती घेतली असता हॉटेलमध्ये ३६ हजार रुपये किमतीची देशी-विदेशी दारू आणि बिअरच्या बाटल्यांचा साठा आढळून आला. अवैध दारु बाळगणे, त्याची विक्री करणे आणि त्यासाठी साठा केल्यामुळे पोलिसांनी मद्यसाठा जप्त केला. हॉटेल चालविण्याचा परवानाही हॉटेल मालकाकडे नव्हता. या दोन्ही प्रकरणी हॉटेल मालक मंगेश दिनकर रणसिंग (वय २५, रा. वडगाव तांदळी, ता. नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल आनंद सत्रे, पोलीस नाईक औटी, गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आनंद भगवान सत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एम.ए. थोरात करीत आहेत. (प्रतिनिधी)