भांडण मिटविल्याच्या रागातून दोन गटात तुंबळ हाणामारी; नऊ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 10:42 IST2020-05-19T10:42:19+5:302020-05-19T10:42:53+5:30

दोन व्यक्तीतील भांडण का मिटविले? याचा राग धरून दोन गटात दगड, लोखंडी गजासह शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी एकमेकास तुंबळ हाणामारी झाली. ही घटना सोमवारी (दि.१८) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास शहरातील आयेशा कॉलनी येथील नुरे इस्लाम मजीदजवळ घडली. यात चार जण जखमी झाले आहेत.

Violent fighting between the two groups out of anger over the settlement of the quarrel; Charges filed against nine persons | भांडण मिटविल्याच्या रागातून दोन गटात तुंबळ हाणामारी; नऊ जणांवर गुन्हा दाखल

भांडण मिटविल्याच्या रागातून दोन गटात तुंबळ हाणामारी; नऊ जणांवर गुन्हा दाखल

कोपरगाव : दोन व्यक्तीतील भांडण का मिटविले? याचा राग धरून दोन गटात दगड, लोखंडी गजासह शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी एकमेकास तुंबळ हाणामारी झाली. ही घटना सोमवारी (दि.१८) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास शहरातील आयेशा कॉलनी येथील नुरे इस्लाम मजीदजवळ घडली. यात चार जण जखमी झाले आहेत.
 याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणे अमलदार सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे यांनी रात्री उशिरा परस्पर विरोधी फिर्यादीवरुन ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वसिम युसुफ शेख ( रा. आयेशा कॉलनी, कोपरगाव ) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मी घरात असताना अजीज कासम कुरेशी, शकील मेहबूब शेख, सोफियान सलीम कुरेशी, अकिल बशीर शेख, मुन्ना राजू कुरेशी, अफान मुस्ताक शेख ( सर्व रा.आयेशा कॉलनी, कोपरगाव ) यांनी घरात येऊन दुपारी अजीम कुरेशी व इस्माईल कुरेशी यांच्यातील भांडण का मिटविले? असे म्हणून मला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अजिज कुरेशी याने माझ्या डोक्यात दगड मारून दुखापत केली.
 तर अजीज कासम कुरेशी (रा. आयेशा कॉलनी, कोपरगाव ) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मी आयेशा कॉलनी येथील नुरे इस्लाम मजीदजवळ असताना वसिम युसुफ शेख, शकील इस्माईल कुरेशी, जावेद युसुफ शेख (सर्व रा. आयेशा कॉलनी, कोपरगाव) यांनी तेथे येऊन तू दुपारी इस्माईल कुरेशी यास का मारले? असे म्हणून म्हणून मला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वासिम शेख याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने माझ्या डोक्यात दगड मारून दुखापत केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

Web Title: Violent fighting between the two groups out of anger over the settlement of the quarrel; Charges filed against nine persons