लोणी (जि़अहमदनगर) : माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांची दोन नातवंडे शनिवारी बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले़ शालिनी विखे या उसाच्या शेताजवळ नातवंडांना खाऊ देत असतानाच बिबट्याने झेप घेतली़ मात्र, त्याचवेळी त्यांचे कुत्रे मध्ये आले़ कुत्र्याला जबड्यात पकडून बिबट्याने क्षणात उसात धूम ठोकली़उसात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने थेट मुलांच्या दिशेने झेप घेतली़ डोळ्याची पाणी लवते न लवते, तोच बिबट्या कुत्र्याला घेऊन दिसेनासा झाला़अचानक हल्ल्याने शालिनी विखेही घाबरल्या़
बिबट्याच्या हल्ल्यातून बचावली विखेंची नातवंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 06:24 IST