शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Video : आम्हाला पण पर्याय नाही! म्हणत त्रस्त शेतकऱ्याने दिला आत्महत्येचा इशारा; व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 17:24 IST

Farmer News : हताश झालेल्या शेतकरी चव्हाण यांनी शेतात साठलेल्या पाण्याशेजारी बसून आत्महत्येचा व्हिडिओ शूट करत आत्महत्येचा इशारा दिला असून तो व्हायरल होत आहे. याबाबत अद्याप कोणतीही पोलीस तक्रार दाखल नाही. 

ठळक मुद्दे  शिर्डीजवळ चारीच्या शेजारी चव्हाण यांची दोन एकर शेती आहे. मात्र, ऐन माशगतीच्या वेळी त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होऊन पाणी साचत असल्याने पुढील पिके घेता येत नाहीत.

अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील बापू दादा चव्हाण या शेतकऱ्याने एका व्हिडिओद्वारे आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. शेतकरी आत्महत्या करत नाही तर सरकारच त्याला प्रवृत्त करतं असं म्हणत त्याने हताश होऊन व्हिडीओ शूट केला. तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जलसंपदा विभागाच्या चुकीमुळे कालव्यातुन गळणारे पाणी चव्हाण यांच्या शेतात येते. गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी त्यांच्या शेतीला तळ्याला स्वरूप येते. अनेकदा पाठपुरावा करूनही कालव्याची दुरुस्ती होत नसल्याने हताश झालेल्या शेतकरी चव्हाण यांनी शेतात साठलेल्या पाण्याशेजारी बसून आत्महत्येचा व्हिडिओ शूट करत आत्महत्येचा इशारा दिला असून तो व्हायरल होत आहे. याबाबत अद्याप कोणतीही पोलीस तक्रार दाखल नाही.  शिर्डीजवळ चारीच्या शेजारी चव्हाण यांची दोन एकर शेती आहे. मात्र, ऐन माशगतीच्या वेळी त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होऊन पाणी साचत असल्याने पुढील पिके घेता येत नाहीत. त्यातून लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची चव्हाण यांचं गाऱ्हाणं आहे. त्यांनी जलसंपदा विभागाला यासाठी जबाबदार धरले आहे. त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे की, चारीतून चुकीच्या पद्धतीने पाणी सोडले जाते. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून माझ्या शेतात पाणी साठते. जेथे पाणी जाऊ शकत नाही, तेथे ते बळजबरीने नेऊन इतरांची मोठमोठी शेततळी भरली जातात. त्यासाठी दीर्घकाळ पाणी सुरू राहते. त्यामुळे आपल्या शेतात पाणी साठते. गेल्या दहा वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. 

उन्हाळ्यात माशगत करून पुढील पिकासाठी शेत तयार केले की, हे पाणी येते. बराच काळ हे पाणी साठून राहत असल्याने आपले मोठे नुकसान होते. यामुळे कर्जबाजारी झालो आहे. आपल्यासह आणखी काही शेतकऱ्यांना हा त्रास होत आहे. शिर्डीजवळ चारीत बिघाड झाला आहे. चव्हाण यांनी हा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, त्याच्या दुरुस्तीचे काम केले जात नाही. दरवर्षी मेहनत करून शेत तयार करायचे आणि नंतर पाणी आल्यावर नुकसान सहन करायचे, असा प्रकार सतत सुरू आहे. एकदा पाणी साठले की पुढील तीन-चार महिने हे पाणी साठून राहते. पावसाळ्यात समजू शकतो, मात्र उन्हाळ्यातही एखाद्या तळ्याप्रमाणे शेतात पाणी साठून राहत आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही,' अस त्यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारच शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करतो असा आरोप त्यांनी केला आहे. 

 

धरणातून जेव्हा आवर्तन सुटते तेव्हा माझ्या शेतात पाणी साचते. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत जलसंपदा विभाग व तहसीलदार यांना २०१७ पासून तक्रारी करत आहे. मात्र काहीच दखल घेतली गेली नाही. मंगळवारी जलसंपदा विभागातील काही कर्मचारी शेतात आले होते. उपाययोजना करतो असे त्यांनी सांगितले मात्र अजूनतरी काहीच त्यांनी केलेले नाही. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत काहीच दखल घेतलेली नाही. - बापू चव्हाण, शेतकरी, धारणगाव ता. कोपरगाव

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगरshirdiशिर्डीfarmer suicideशेतकरी आत्महत्याIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पGovernmentसरकार