१११ वटवृक्षांचे रोपण आणि पूजन करत साजरी केली वटपौर्णिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:34+5:302021-06-26T04:16:34+5:30
सारोळा कासार येथील वृक्षदेवता महिला ग्रुपचा अनोखा उपक्रम लोकमत न्यूज नेटवर्क केडगाव : नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील महिलांनी ...

१११ वटवृक्षांचे रोपण आणि पूजन करत साजरी केली वटपौर्णिमा
सारोळा कासार येथील वृक्षदेवता महिला ग्रुपचा अनोखा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
केडगाव : नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील महिलांनी वटपौर्णिमा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली. गावच्या परिसरात १११ वटवृक्षांचे रोप, पूजन करत त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली. १११ वटवृक्ष लावण्याची संकल्पना वृक्षमित्र सचिन कडूस यांनी मांडली. विश्वास बीज ग्रुपचे अध्यक्ष जगदीश शिंदे यांनीही या उपक्रमासाठी वटवृक्षांची १११ रोपे उपलब्ध करून दिली. वृक्ष देवता ग्रुपच्या शोभा धामणे, बेबीताई काळे, राधिका कडूस, सुजाता काळे, शारदा भोसले, नीलम धामणे, ज्योती धामणे यांच्यासह अन्य महिलांनी महिलांना वटवृक्षांची रोपे दत्तक घेण्याचे आवाहन केले. वृक्षमित्र सचिन कडूस, उपसरपंच जयप्रकाश पाटील, शहाजान तांबोळी, सतीश कडूस, शुभम कडूस, राहुल कडूस, शिवाजी वाव्हळ यांनी घरोघरी रोपांचे वाटप केले.