रूईछत्तीसी येथे कोरोनाच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:21 IST2021-05-14T04:21:33+5:302021-05-14T04:21:33+5:30

रूईछत्तीसी : रूईछत्तीसी (ता. नगर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्या लसीकरण झालेल्या नागरिकांना दुसऱ्या डोसचे (काेविशिल्ड) लसीकरण करण्यात आले. ...

Vaccination of the second dose of corona at Ruichattisi | रूईछत्तीसी येथे कोरोनाच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण

रूईछत्तीसी येथे कोरोनाच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण

रूईछत्तीसी : रूईछत्तीसी (ता. नगर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्या लसीकरण झालेल्या नागरिकांना दुसऱ्या डोसचे (काेविशिल्ड) लसीकरण करण्यात आले. शंभर डोस उपलब्ध झाले होते. प्रत्येकाची रॅपिड अँटिजन टेस्ट करून लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यातील एकही बाधित रुग्ण आढळला नाही. कोरोनाच्या नियमावलीत लसीकरणाचे यशस्वी नियोजन करण्यात आले होते. आरोग्य कर्मचारी यांनी अतिशय नियोजनपूर्वक परिस्थिती हाताळल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी पंचायत समितिचे माजी उपसभापती रवींद्र भापकर, गावचे सरपंच विलास लोखंडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य अधिकारी सविता ससाणे व गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

लसीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींनी घरी जाऊन चांगला आराम करावा, योग्य असणारी पथ्ये पाळावीत, तोंडाला मास्क आणि सॅनिटायझर यांचा नियमित वापर करावा, असे आवाहन आरोग्य अधिकारी सविता ससाणे यांनी केले.

Web Title: Vaccination of the second dose of corona at Ruichattisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.