शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

साईनगरीत अभूतपूर्व सन्नाटा; शिर्डीचा श्वास थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 14:42 IST

चोवीस तास सुरू असलेले गाव अशी ओळख असलेल्या साईनगरीत रविवारी (दि.२२ मार्च) जनता संचारबंदीच्या निमित्ताने अभुतपूर्व सन्नाटा अनुभवायला मिळाला. सतत गजबजलेला परिसर बघण्याची सवय झालेल्या डोळ्यांना आजची शिर्डी स्वप्नवत व अविश्वसनीय भासत होती.

शिर्डी : चोवीस तास सुरू असलेले गाव अशी ओळख असलेल्या साईनगरीत रविवारी (दि.२२ मार्च) जनता संचारबंदीच्या निमित्ताने अभुतपूर्व सन्नाटा अनुभवायला मिळाला. सतत गजबजलेला परिसर बघण्याची सवय झालेल्या डोळ्यांना आजची शिर्डी स्वप्नवत व अविश्वसनीय भासत होती.वर्षाकाठी तीन कोटी तर रोज लाखभर भाविकांची वर्दळ असलेल्या शिर्डीतील रस्ते रविवारी निर्मनुष्य झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला शिर्डीत ना भुतो, ना भविष्यती.. असा प्रतिसाद मिळाला. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून शिर्डीतील साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनानेही दोन दिवसांपासून शहरातील उद्योग, व्यवसायही बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे शिर्डीतील रस्त्यांनी, गल्ली-बोळांनी अगोदरच मोकळा श्वास घेतला होता. आजच्या जनता कर्फ्यूने मात्र चोवीस तास जीवंतपणा अनुभवणा-या संपूर्ण शहराचा श्वासच थांबलेला दिसला.दिवस-रात्र भाविकांच्या व वाहनांच्या गर्दीने ओसंडून वाहणा-या रस्त्यावर चक्क शुकशुकाट झाला होता. मंदिर परिसरच नव्हे तर महामार्गावरही अभुतपूर्व शांतता अनुभवायला मिळाली. साईमंदिरातही केवळ पुजा-यांनी बाबांची आरती केली. एरव्ही भाविकांनी फुललेला मंदिर परिसर, साईनामाचा जयघोष करणारे अनेक भाविक, भाविकांच्या मागे लागलेले कमिशन एजंट, भिकारी, मंदिराच्या स्पीकरवरून गर्दीत हरवलेल्या व्यक्तींच्या नावांचा पुकारा, वाहनांचे हॉर्न, हातविक्री करणा-या मुलांची आरडाओरड, दुकानातील रेकॉर्ड, गर्दीतुनही प्रवासी गोळा करीत फिरणारी खासगी वाहने, पाण्याचे टँकर हे सर्व आज शिर्डीच्या कॅनव्हास वरून नाहीस झालेल होत़े.साई मंदिरात घंटानादशिर्डीत रविवारी सायंकाळी साडेचार वाजता साईस्तवनमंजिरीचे घरोघरी एकाच वेळी पठण होणार आहे. संस्थानच्या स्पिकरवरही ते लावल जाणार आहेत. यानंतर पाच वाजता घरोघरी टाळ्या, थाळा, घंटा वाजवण्यात येणार आहे. तर साईमंदिरासह गावातील सर्वच मंदिरात घंटानाद करण्यात येणार आहे. संस्थानमध्ये सायरनही वाजवण्यात येणार आहे. सगळे शिर्डीकर साडेचार वाजण्याची प्रतीक्षा करीत आहेत. यानंतर कोरोनाचा प्रकोप शांत होत नाही तोपर्यंत शिर्डीत रोजच हा उपक्रम राबवला जाणार आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबाcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य