शिर्डीजवळ ट्रक-दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:27 IST2020-05-29T10:59:05+5:302020-05-29T12:27:32+5:30

नगर-मनमाड महामार्गावरील शिर्डी-साकुरी परिसरात मालट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.२८ मे) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

Two youths killed in truck-bike accident near Shirdi | शिर्डीजवळ ट्रक-दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

शिर्डीजवळ ट्रक-दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

शिर्डी : नगर-मनमाड महामार्गावरील शिर्डी-साकुरी परिसरात मालट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.२८ मे) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

 साईनाथ कचरु भडांगे (रा.पूनमनगर,शिर्डी), अविनाश चांगदेव भगुरे (वय २५,रा.कोपरगाव) असे मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत.

 साईनाथ भडांगे, अविनाश भगुरे हे दोघेजण मोटार सायकल क्रमांक एम.एच.-१७, सी.डी. ६४१५ वरुन नगर-मनमाड रस्त्याने राहात्याकडून शिर्डीकडे येत असताना हॉटेल केबीएस ग्रँडसमोर ट्रक क्रमांक जे.के.०२, बी.एम.२९२८ ची त्यांच्या दुचाकीस जोराची धडक बसली. या अपघातात दोघांना जागीच मृत्यू झाला. यातील मयत भगुरे हा शिर्डी येथे एका गॅस एजन्सीज कामास होता. शिर्डी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

Web Title: Two youths killed in truck-bike accident near Shirdi