अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; नाशिक-पुणे महामार्गावरील अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 12:57 IST2020-05-17T12:56:35+5:302020-05-17T12:57:09+5:30
अज्ञात वाहनाने मोटारसायकलस्वारास धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. हा अपघात रविवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील माहुली घाटानजीक झाला. एकनाथ नामदेव मोहिते (वय ५०, रा. जांबुत बुद्रुक, ता.संगमनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; नाशिक-पुणे महामार्गावरील अपघात
घारगाव : अज्ञात वाहनाने मोटारसायकलस्वारास धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. हा अपघात रविवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील माहुली घाटानजीक झाला. एकनाथ नामदेव मोहिते (वय ५०, रा. जांबुत बुद्रुक, ता.संगमनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
रविवारी सकाळी एकनाथ मोहिते हे दुचाकीवर (क्रमांक एम.एच.१७, ए.के.७७०८) नाशिक-पुणे महामार्गाने संगमनेरच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला माहुली परिसरात अज्ञात वाहनाने धडक दिली. दुचाकी महामार्गाच्या खाली जाऊन गटारीत जाऊन आदळली. मोहिते यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. नागरिकांनी घारगाव पोलीस ठाण्याला ही माहिती दिली. घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात खाजगी रुग्णवाहिकेद्वारे पाठविण्यात आला. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ गांधले पुढील तपास करीत आहेत.