अहमदनगर जिल्ह्यात आढळले आणखी दोन कोरोना बाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:10 IST2020-05-20T23:08:43+5:302020-05-20T23:10:39+5:30
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ४८ पैकी ४५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काल संगमनेर शहरातील रहमत नगर येथील बाधीत व्यक्तीची पत्नी आणि नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील एक रिक्षाचालक यांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

अहमदनगर जिल्ह्यात आढळले आणखी दोन कोरोना बाधीत
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ४८ पैकी ४५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काल संगमनेर शहरातील रहमत नगर येथील बाधीत व्यक्तीची पत्नी आणि नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील एक रिक्षाचालक यांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील कोरोना बाधीत वृद्ध महिलेचा १० दिवसा नंतरचा अहवालही पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधीत व्यक्तीची संख्या आता ६८ झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
आज रात्री ४८ अहवाल जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाले. काल संगमनेर येथील एक व्यक्ती बाधीत आढळून आला होता. त्याच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात, या व्यक्तीची पत्नी बाधित झाल्याचे आढळून आले.
याशिवाय, नगर शहरातील एका रिक्षाचालकाला कोरोनाची लागण झाली आहे. सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याला दोन दिवसापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. हा व्यक्तीही बाधीत आढळून आला.
काही दिवसापूर्वी सुभेदार गल्ली येथील वृद्ध महिला बाधीत आढळून आली होती. या महिलेचा १० दिवसांनंतर आज आलेला अहवालही पॉझिटिव आला आहे.
उर्वरित सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.